सुनील मनोहर गावसकर (१० जुलै १९४९) क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम करणारा प्रसिद्ध भारतीय खेळाडू. याचा जन्म मुंबईत झाला. तेथील सेंट झेवियर्स शाळा व त्याच नावाच्या महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. १९७० मध्ये त्याने बी.ए. ची पदवी संपादन केली. १९७४ मध्ये त्याचा विवाह मार्शनील मेहरोत्रा या युवतीशी झाला. त्यांना रोहन हा एक मुलगा आहे. गावसकरचे वडील आणि काका हे चांगले क्रिकेटपटू होते. त्याचे एक मामा माध्व मंत्री ह्यांनी ही भारतातर्फे कसोटी सामन्यात भाग घेतला होता. शिवाय त्याचे दोन्ही आजोबा आणि आई ह्यांना क्रिकेटविषयी विशेष प्रेम होते. ह्या क्रिकेटमय वातावरणात वाढल्यामुळे सुनीलला लहानपणापासूनच क्रिकेटची उत्कट आवड निर्माण झाली. घरातील सर्व मंडळींनी त्याला क्रिकेट खेळण्यास मनापासून प्रोत्साहन दिले. आपण चांगला फलंदाज बनणार, हे त्याने प्रथमपासून ठरविले होते. लहानपणापासून खेळताना बाद न होण्याच्या जिद्दीने तो खेळत असे.

Read full article: सुनील मनोहर गावसकर / Sunil Manohar Gavaskar

Tags:  / / / / / /

Rate this Article:
0
0